News Flash

“मोदीजींचे काही ‘मित्र’ नव्या भारताचे जमीनदार होतील”

नव्या कृषी कायद्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल

संसदेच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारनं कृषि क्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांना मजुरी दिली. सरकारच्या कृषी क्षेत्राशी संबधित या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही या तिन्ही विधेयकांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हल्ला चढवला आहे.

कृषी क्षेत्राशी संबंधित या तिन्ही विधेयकांविषयी राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. “मोदीजींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं. पण मोदी सरकारच्या काळ्या कायदे शेतकरी आणि शेतमजूरांचं आर्थिक शोषण करण्यासाठी केले जात आहेत. हे जमीनदारीचं नवं स्वरूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

आणखी वाचा- “GDP घसरलाय, RBI कंगाल झाली आहे अन् सरकारनं कंपन्यांचा मोठा सेल लावलाय”

आणखी वाचा- “मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकरी विरोधी,” केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा

विधेयकांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

मोदी सरकारच्या या तिन्ही विधेयकांविरोधात पंजाब हरयाणातील शेतकरी संतप्त आहेत. या तिन्ही विधेयकांना शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व विधेयकांच्या विरोध करण्यासाठी मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश असलेल्या अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आपण शेतकरी विरोधी कायद्याविरोधात केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत. शेतकरी आणि मुलामुलींच्या पाठिंशी उभं राहू असं म्हणत त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:45 am

Web Title: rahul gandhi narendra modi modi government harsimrat kaur badal bmh 90
Next Stories
1 ‘चीनने संपूर्ण फौजा तात्काळ मागे घ्याव्यात’
2 चीनच्या ५ नागरिकांवर अमेरिकेकडून ‘हॅकिंग’चा आरोप
3 सोने तस्करीप्रकरणी केरळच्या उच्च शिक्षणमंत्र्यांची चौकशी
Just Now!
X