News Flash

सजग शेतकऱ्याला माहितीये की, कृषि विधेयकातून…; राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

"मोदीजींचे मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील"

मोदी सरकारच्या कृषि क्षेत्रातील तीन विधेयकावरून घमासान सुरू आहे. या विधेयकावरून एनडीएतील सदस्य आणि भाजपाचा जुना मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरे पंजाब, हरयाणासह अनेक राज्यात शेतकऱ्यांकडून प्रस्तावित विधेयकांना विरोध होताना दिसत आहे. या विधेयकावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे. गांधी यांनी पुन्हा एकदा ट्विट करून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

कृषीक्षेत्र खुले करणारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. आंतरराज्यीय शेतीमाल विक्रीला मुभा देणारी, कृषी बाजार समित्यांची एकाधिकारशाही रद्द करणारी व कंत्राटी शेतीला परवानगी देणारी दोन विधेयके लोकसभेत गुरुवारी मंजूर करण्यात आली. जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. ही तिन्ही विधेयके शेतकऱ्यांचे नुकसान करणारी असल्याची टीका होत आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलं होतं. विरोधकांकडून देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.

त्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. “शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरून विश्वास उडाला आहे. कारण सुरूवातीपासून मोदीजींच्या बोलण्यात आणि कृतीत फरक राहिला आहे. नोटबंदी, चुकीचा जीएसटी आणि डिझेडवरती प्रचंड कर. सजग शेतकऱ्याला माहिती आहे की, कृषि विधेयकामुळे मोदी सरकार आपल्या मित्रांचा व्यापार वाढवणार आणि शेतकऱ्या रोजी रोटीवर हल्ला करणार आहे,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

“मोदीजींचे मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील”

“मोदीजींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं वचन दिलं होतं. पण मोदी सरकारच्या काळ्या कायदे शेतकरी आणि शेतमजूरांचं आर्थिक शोषण करण्यासाठी केले जात आहेत. हे जमीनदारीचं नवं स्वरूप आहे आणि मोदीजींचे काही मित्र नव्या भारताचे जमीनदार असतील. कृषी बाजार बंद झाला की, देशाची अन्न सुरक्षा संपली,” अशी टीका राहुल गांधी यांनी गुरूवारी केली होती. विधेयक सभागृहात मांडण्यापूर्वीच राहुल गांधी यांनी यावर भाष्य केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 6:30 pm

Web Title: rahul gandhi narendra modi modi govt agriculture ordinances farmers bmh 90
Next Stories
1 कृषि विधेयक : “काँग्रेसच्या जाहीरनाम्यात होतं ते भाजपानं केलं”
2 खासदारांची पगार कपात करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर
3 “बाबरी विध्वंसाला २८ वर्ष झाली, आता तरी प्रकरण मिटवा”; न्यायालयाला विनंती
Just Now!
X