News Flash

राहुल गांधी भाजपावर कडाडले, “डोकं वाळूमध्ये घालणे म्हणजे सकारात्मकता नाही”

करोनाबाबत राहुल गांधी सतत मोदी सरकारविरोधात घेत आहेत आक्रमक भूमिका

करोना परीस्थितीत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत. राहूल गांधीनी पुन्हा एकदा भाजपा सरकावर निशाणा साधला आहे. करोना परिस्थितीत भाजपाकडून सकारात्मक गोष्टींवर जोर देण्यात येत आहे, तसा प्रचार देखील करण्यात येत आहे. यावरून कॅांग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सकारात्मक विचारसरणीचा आधार देणे म्हणजे आरोग्य कर्मचारी आणि करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या परीवारांसाठी मस्करी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 

राहुल गांधी म्हणाले, वाळूमध्ये डोकं टाकणे म्हणजे सकारात्मकता नाही, ही देशवासीयांची फसवणूक आहे. त्यांनी ट्विटमध्ये एक बातमी देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये भाजप सरकार करोनाबाबत सकारात्मक गोष्टींवर भर टाकणार असल्याचे म्हटले आहे.  

करोनाबाबत राहुल गांधी सतत मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. सोमवारी त्यांनी ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला होता, “मोदीजी तो गुलाबी चष्मा हटवा, ज्यामधून ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाव्यतिरिक्त काहीच दिसत नाही”.  बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आले होते. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली. या घटनेवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती.

राहुल गांधींनी कोरोना साथीच्या या कठीण काळात एकमेकांना मदत करण्याचे आवाहन केले. करोना संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या राष्ट्रीय कार्यालये आणि राज्य कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 12:44 pm

Web Title: rahul gandhi once again criticized the bjp over the corona situation srk 94
Next Stories
1 दुर्दैवी! एका मुलाचे अंत्यसंस्कार संपत नाहीत तोवर दुसरा मुलगा दगावला
2 “सकारात्मक राहण्यासाठी सरकारचे अंध प्रचारक होण्याची गरज आपल्याला नाही”
3 इस्रायलचा गाझापट्टीत एअरस्ट्राईक; ३५ जणांचा मृत्यू
Just Now!
X