छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीमधून ट्विट करून महाराजांना नमन केले आहे. छत्रपछत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी #शिवाजीमहाराजकिजय हा हॅशटॅगही वापरला आहे.

सकाळीच पंतप्रधान मोदींनी शिवजयंतीनिमित्त ट्विट करत शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो असं म्हटलं होतं.

मागील वर्षी मोदींनीही मराठीमधून ट्विट करुन महाराजांना मराठमोळ्या पद्धतीने अभिवादन केले होते. दरम्यान आज देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरही आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन माध्यमांवरही शिवाजी महाराजांबद्दल फोटो, व्हिडीओ आणि स्टेटसच्या माध्यमातून नेटकरी आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. सकाळपासूनच ट्विटवर #ShivajiMaharaj तसेच #ShivajiJayanti हे दोन हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग हॅशटॅग आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi paid tribute in marathi to shivaji maharaj on birth anniversary
First published on: 19-02-2019 at 12:23 IST