News Flash

‘महत्त्वाच्या चर्चेदरम्यानही राहुल गांधी कुत्र्याला बिस्किटेच खाऊ घालायचे’

राहुल गांधींनी ट्विट केलेल्या मिश्किल व्हिडिओवर टीका

संग्रहित छायाचित्र

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट दुसरीच व्यक्ती हँडल करत असल्याच्या आरोपांना यातून उत्तर देण्यात आले आहे. मात्र या व्हिडिओवर टीका होत आहे. भाजपचे नेते आणि आसामचे मंत्री हिमांता बिश्वा शर्मा यांनी या व्हिडिओवर सडकून टीका केली आहे.

आसामच्या मुद्द्यावर जेव्हा राहुल गांधी यांच्याशी मी चर्चा करायचो तेव्हाही राहुल गांधी हे कुत्र्याला बिस्किटेच खाऊ घालत बसायचे, असे ट्विट शर्मा यांनी केले आहे. राहुल गांधींनी ज्या ‘पीडी’ या कुत्र्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे त्या कुत्र्याला माझ्यापेक्षा जवळून जास्त कोण ओळखतो? मला चांगले लक्षात आहे की राहुल गांधी आणि मी जेव्हा आसाम आणि तिथल्या समस्यांवर चर्चा करायचो तेव्हा ते बऱ्याचदा त्यांच्या पाळीव कुत्र्याला अर्थात पीडीला बिस्किटे खाऊ घालण्यात मग्न असायचे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे. ट्विट करून त्यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

शर्मा हे आसाममध्ये काँग्रेसचे आमदार होते. २०१५ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या शर्मा हे आसामचे शिक्षण मंत्री म्हणून काम करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर ट्विटर अकाऊंट वापरताना बॉट्सचा वापर केल्याची टीका झाली. तसेच विदेशातील काही बनावट अकाऊंटद्वारे राहुल गांधींचे ट्विट रिट्विट केले जातात असाही आरोप भाजपने केला. या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी एक मिश्किल व्हिडिओ राहुल गांधी यांनी पोस्ट केला. मात्र आता या व्हिडिओवरही टीका होताना दिसते आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 6:55 pm

Web Title: rahul gandhi popularity on twitter himanta biswa sarma says he knows pidi better than anyone
टॅग : Rahul Gandhi
Next Stories
1 राहुल गांधी म्हणतात, ‘हा’ करतो माझे सगळे ट्विट : पाहा व्हिडिओ
2 अहमदाबादच्या सरकारी रूग्णालयात २४ तासांत ९ नवजात बालकांचा मृत्यू
3 ‘रूपये घासून त्याचे पैसे करणारा तो ‘पंजा’ कुणाचा?’ : पंतप्रधान
Just Now!
X