काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी युरोपातील सुट्टीनंतर रविवारी भारतात परतले असून त्यांनी सोमवारी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे.
राहुल गांधी गत वर्षी कोणतीही पूर्वसूचना न देता युरोपात सुट्टीवर गेल्याने मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे २८ डिसेंबर रोजी युरोपात सुट्टीसाठी जात असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले होते. राहुल गांधी भारतात परतले असून सोमवारी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात राहुल गांधी पूर्वसूचनेशिवाय युरोपात गेले होते. त्यानंतर समाजमाध्यमांतून विरोधा पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तर काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्यांवर नाराजी व्यक्त केली होती.