25 February 2021

News Flash

न्यायव्यवस्थेवरही मोदी सरकारचे नियंत्रण; राहुल गांधींचा घणाघात

"लोकसभा व राज्यसभेत आवाज दाबला जातोय"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर गंभीर आरोप केला. केंद्र सरकार स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायपालिकेवर लादत असून, न्यायालयांनी जे करणं आवश्यक आहे, ते सरकारकडून करू दिलं जात नाही. न्यायव्यवस्थेवर मोदी सरकारचे नियंत्रण आहे,” अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मालाप्पुरम येथे सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. “दिल्लीतील सरकार (मोदी सरकार) स्वतःच्या इच्छा आणि ताकद न्यायव्यवस्थेवर लादत आहे. केंद्र सरकार होऊ काही गोष्टी होऊ देत नाही किंवा जे करणं आवश्यक आहे, ते न्यायपालिकेला करू देत नाही. हे फक्त न्यायालयांच्या बाबतीतच नाही, तर ते लोकसभा आणि राज्यसभेतही चर्चा करू देत नाही. निवडणूक जिंकणं म्हणजे हरणं आणि हरणं म्हणजे जिंकणं असं पहिल्यादांच घडत आहे,” अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

आणखी वाचा- …हे महान काम मोदी सरकार सध्या मोफत करतंय; राहुल गांधींचा टोला

आणखी वाचा- दिशा रवीवर श्रीधरन यांचा निशाणा; म्हणाले, “डिजिटल अ‍ॅक्टिव्हीस्ट देशाची प्रतिमा मलिन करतात, अशा लोकांविरोधात…”

राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करताना दिसत आहे. भारत-चीन सीमावाद, करोना आणि लॉकडाउन व पेट्रोल डिझेल च्या किंमतीनंतर राहुल गांधी यांनी प्रथमच न्यायव्यवस्थेवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना भाजपा काय उत्तर देणार, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:32 pm

Web Title: rahul gandhi says govt in delhi is imposing its will and power on judiciary bmh 90
Next Stories
1 पाच लाख करोनाबळी… अमेरिकेत करोना कहर थांबेना; राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, “एक देश म्हणून आपण…”
2 देशाची आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ चतु:सूत्री!
3 कर्नाटकात जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू
Just Now!
X