21 September 2020

News Flash

अयोध्येत राम मंदिर हवे की नको?, राहुल गांधीजी उत्तर द्या; अमित शाह यांचे आव्हान

एकेकाळी एकमेकांचा चेहराही न बघणारे, एकमेकांना नमस्कारही न करणारी लोक आता एकत्र येत आहेत

संग्रहित छायाचित्र

अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही भाजपाची भूमिका आहे. राहुल गांधी यांना अयोध्येत राम मंदिर हवे की नको , आता त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिले आहे.

उत्तराखंडमधील डेहराडून येथे अमित शाह यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन त्यांनी राहुल गांधी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर प्रदेशमधील सपा- बसपा महाआघाडीवरुनही अमित शाह यांनी टीका केली. एकेकाळी एकमेकांचा चेहराही न बघणारे, एकमेकांना नमस्कारही न करणारी लोक आता एकत्र येत आहेत, यावरुन एकच स्पष्ट होते की भाजपाची ताकद वाढली आहे आणि यामुळेच सर्वांना एकत्र यावे लागले, असा चिमटा त्यांनी काढला.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही गरीब लोकांना उपचार मिळत नव्हते. मोदींनी आयुष्मान भारत योजना आणली, आता गरीबांना पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहे. राजीव गांधी सांगायचे की दिल्लीतून एक रुपया पाठवला की १५ पैसेच शेवटपर्यंत पोहोचतात. आम्ही सत्तेत आल्यावर थेट बँक खात्यात पैसे जमा केले, असे शाह यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात इतक्या मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 3:05 pm

Web Title: rahul gandhi should clear his stand on ram mandir says bjp chief amit shah
Next Stories
1 छेड काढणाऱ्या तरुणाचे अपहरण, सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला अटक
2 शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने मगरीचे अश्रू ढाळणे बंद करावे- जेटली
3 प्रजासत्ताक दिनी राहुल गांधींसोबत काय चर्चा झाली?, गडकरींनी उघड केले गुपित
Just Now!
X