News Flash

“लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानसुद्धा गायब”; राहुल गांधी यांची मोदींवर टीका

"उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण येऊन त्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र सध्या देशभरात आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमी असल्याचे काही दिवसापूर्वी पहायला मिळत होते. करोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाचा पर्याय सध्या समोर आहे. अशातच देशात मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून लस पुरवठा होत नसल्याचा आरोप अनेक राज्यांनी केला आहे. लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या सर्वांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी करोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींना टीकेचे लक्ष्य केलं आहे.

लस आणि ऑक्सिजन सोबत पंतप्रधान मोदी सुद्धा देशातून गायब आहेत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब आहेत. उरलं आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”, असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आणखी वाचा- PM Cares मधून पाठवलेले व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या दाव्यावर मोदी सरकारकडून खुलासा

राहुल गांधी यांच्यासह अन्य पक्षांनी देखील सेंट्रल विस्टा प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच करोनावरील औषधांवर जीएसटी कर न लावण्याची देेखील मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली होती. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करोना औषधे, लसी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील असं सांगितले होते.

आणखी वाचा- चिंतेत आणि रुग्णसंख्येत भर… मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा संसर्ग झालेल्यांची संख्या अधिक

याआधी देखील काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी देशातील वाढत्या करोना संक्रमणावरुन आणि लसीकरणावरुन बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली होती. घरोघरी जाऊन लसीकरण केल्याशिवाय करोनासोबत लढणं अशक्य असल्यांच त्यांनी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 11:28 am

Web Title: rahul gandhi slams pm narendra modi oxygen vaccine central vista abn 97
Next Stories
1 PM Cares मधून पाठवलेले व्हेंटिलेटर्स सदोष असल्याच्या दाव्यावर मोदी सरकारकडून खुलासा
2 भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी
3 आरोग्य सेतू, झोमॅटो, ओला आमच्यापेक्षा जास्त डेटा गोळा करतात; WhatsApp चा हायकोर्टात दावा
Just Now!
X