काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदी सरकारविरोधात कायम ट्विट करत असतात. त्यांच्या या ट्विट्समुळे ते चांगलेच चर्चेत येतात. आताही ते ट्विटरममुळे चर्चेत येतात. पण यावेळचं कारण त्यांचं नवं ट्विट नसून काहीतरी वेगळंच आहे. राहुल गांधी य़ांनी आपल्या ट्विटरवरच्या लिस्टमधून अनेकांना अनफॉलो केलं आहे.

आज तकने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्याच पक्षाचे काही नेते, काही मित्र आणि काही पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. यामध्ये वायनाडच्या कार्यालयातले काही लोक आणि दिल्लीतल्या काही ज्येष्ठ पत्रकारांचाही समावेश आहे. राहुल यांच्या या कृतीची सोशल मीडियावर तसंच राजकीय वर्तुळांमध्येही जोरदार चर्चा आहे.

आणखी वाचा- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींनी साधला निशाणा, म्हणाले…

पक्षांच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, सध्या राहुल यांचं ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केलं जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरच एक यादी तयार केली जाईल. या यादीमध्ये ज्या लोकांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील अशा लोकांची नावं असतील. या प्रक्रियेनंतर आत्ता अनफॉलो केलेल्या लोकांनाही राहुल फॉलो करु शकतात.

आणखी वाचा- इशाऱ्यांनंतरची ‘सकारात्मकता’!

मंगळवारपासून राहुल यांनी अचानक अनेकांना अनफॉलो करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांची टीम जी नवी यादी तयार करत आहे, त्यामध्ये अनेक नेते, पत्रकार तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक समाविष्ट असतील.
राहुल यांची ही कृती त्यांच्या आगामी राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल ट्विटरवर बरेच सक्रिय आहेत. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर बरीच टीकाही केली आहे.