आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या मतदान मोहीमेस सुरुवात झाली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देहरादून येथे रॅलीत संबोधित करत आहे.
रॅलीस संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपच्या नेत्यांवर निशाना साधला. ते म्हणाले की, काही लोक एकमेकांमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत. भाजपच्या नेत्यांमध्ये दुरदृष्टीचा अभाव आहे. राजकारणाचा अर्थ दुखः दूर करणे असून, घमेंड असेल तेथे दूसऱ्याचे दुख दिसणार नाही. राजकारणात घमेंड आणि रागाला थारा नाही.
सोनिया गांधी आणि पंतप्रधान यांनी लष्कराच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. भारतीय सैन्यात ‘वन रँक पेन्शन’ योजना चालू करण्यात आली आहे, असे गांधी म्हणाले. तसेच, महिलांशिवाय देशाचा विकास होणेअशक्य आहे, असे म्हणत त्यांनी महिलांना मजबूत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. महिलांना मजबूत केल्याशिवाय भारत सुपर पॉवर बनू शकत नाही. राजकारणात महिलांच्या योगदानाचा हिस्सा वाढला पाहिजे.