08 March 2021

News Flash

भाजप भ्रष्टाचारात वस्ताद -राहुल गांधी

भाजप भ्रष्टाचारात वस्ताद असून, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या कारभाराकडे पाहिले की हे लक्षात येते.

| November 29, 2013 12:18 pm

भाजप भ्रष्टाचारात वस्ताद असून, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या कारभाराकडे पाहिले की हे लक्षात येते. त्यामुळे जनतेने या भ्रष्टाचारी पक्षास निवडून न देता राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसलाच सत्तेवर आणावे, असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. राजस्थानमधील बंसवारा येथील सभेत राहुल बोलत होते. ‘भाजपने आमच्या पेक्षा अधिक कामे केली आहेत, हे दाखवून द्यावे. त्यांनी केवळ भ्रष्टाचारच केला आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या राज्यांमध्ये सत्ताधारी भाजपने मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. ते भ्रष्टाचारात वस्तादच नाही तर तो करण्यात वेगवानही आहेत,’ असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:18 pm

Web Title: rahul gandhi targets bjp over corruption
टॅग : Corruption,Rahul Gandhi
Next Stories
1 मोदींच्या सभेसाठी जम्मूमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
2 अबू सालेमला सात वर्षे सश्रम कारावास
3 मोदींच्या ‘गुजरात मॉडेल’ला वस्तुस्थितीचा आधार नाही
Just Now!
X