News Flash

Coronavirus : “…दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू उत्तरदायी शून्य, केलं सिस्टमने ‘आत्मनिर्भर’!”

राहुल गांधींनी मोदी सरकारवर साधला पुन्हा एकदा निशाणा

संग्रहीत छायाचित्र

देशात दिवसेंदिवस करोना संसर्ग वाढताना दिसत आहे. दररोज लाखांच्या संख्येत नवीन रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. आजपर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन लाखांच्या वर पोहचली आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

“कोविडच्या दुसऱ्या लाटेचा चौथा आठवडा, दोन लाखांपेक्षा जास्त मृत्यू उत्तरदायी शून्य..केलं सिस्टिमने ‘आत्मनिर्भर’!” असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे.

तसेच, “ज्याच्यामध्ये भावना नाही, जे दुःख ऐकून घेण्यास तयार नाही. ते हृदय नाही दगड आहे, ज्या सिस्टिमला लोकांशी प्रेम नाही!” असंही राहुल गांधींनी या अगोदर ट्विट केलेलं आहे.

“ ‘सिस्टम’ फेल आहे…” म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा!

याशिवाय,, “ ‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणं महत्वाचं आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना सर्व मदत करा, सर्व प्रकारे देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे.” असंही राहुल गांधी या अगोदर ट्विट द्वारे म्हणालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 8:23 pm

Web Title: rahul gandhi targets modi government over corona epidemic deaths msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रापाठोपाठ पश्चिम बंगालनंही घेतला निर्णय! डोस आल्यानंतरच १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण!
2 बिल गेट्स भारताचा उल्लेख करत म्हणाले, “करोना लसीचा फॉर्म्युला विकसनशील देशांना देऊ नये, कारण…”
3 “मला आज रडू येतंय, आमदार असल्याची लाज वाटते”, दिल्लीतील ‘आप’च्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल!
Just Now!
X