News Flash

घरगुती गॅसच्या दर वाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय देखील सांगितलेले आहेत.

संग्रहित छायाचित्र

एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे अगोदर पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे त्रस्त असलेल्या सामान्यांना मोठा झटका बसला आहे. या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या

“एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा- चूल फुका- खोटी आश्वासनं ऐकून पोट भरा!” असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

२५ रुपयांची वाढ झाल्याने आता १४.२ किलो घरगुती गॅस सिलेंडरसाठी दिल्लीत ८१९ रुपये मोजावे लागणार आहेत. नवीन दर आजपासून लागू होत आहेत. याआधी २५ फेब्रुवारी रोजी किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली होती. तसेच, ४ फेब्रुवारीला २५ रुपयांची वाढ झाली होती. तर १४ फेब्रुवारीला ५० रुपयांनी दर वाढले होते.

‘वो जुमलों का शोर मचाते हैं, हम…’, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर राहुल गांधींची शेरोशायरी!

राहुल गांधी यांनी या अगोदर इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं! असं म्हणत राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये केंद्रातील भाजपप्रणीत सरकारवर टीका केली आहे. “जून २०१४मध्ये भाजपचं सरकार आलं, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होतं. गेल्या ७ वर्षांत कच्चं तेल ३० डॉलरने स्वस्त झालंय. पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करतंय आणि डिझेल त्याच्या पाठपाठ जातंय’, असं या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय. ‘२०२१मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे”, अशी आकडेवारी देखील त्यांनी सादर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 1:52 pm

Web Title: rahul gandhi targets modi government over rising domestic gas prices says msr 87
Next Stories
1 “पंतप्रधान मोदींनी करोनाची लस घेतल्याने…”; फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
2 या टी स्टॉलवर एक कप चहाची किंमत हजार रुपये! कारण तर जाणून घ्या…
3 जागतिक अस्थैर्याचे शेअर बाजारात पडसाद, सेन्सेक्स १५०० अंकांनी गडगडला
Just Now!
X