भूसंपादन विधेयकासंदर्भातील कायद्यात केंद्र सरकारने सुचवलेल्या बदलांबाबत विविध राज्यांमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी चर्चा करतील. रविवारी दिल्लीत काँग्रेसने शेतकऱ्यांची सभा आयोजित केली आहे. त्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा होत आहे.
राहुल यांच्यासह ज्येष्ठ नेते जयराम रमेश व दिग्विजय सिंह शेतकऱ्यांच्या विविध संघटनांशी चर्चा करतील. उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, पंजाब व मध्य प्रदेशातून शेतकरी दिल्लीत चर्चेसाठी येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 18, 2015 2:23 am