09 March 2021

News Flash

राहुल गांधींनी आजारी पर्रिकरांची घेतली भेट

प्रकृतीत लवकर सुधारणा होण्याच्या दिल्या सदिच्छा

गोवा : राहुल गांधी यांनी आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची विधानसभेत जाऊन भेट घेतली.

गोव्याच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (दि.२९) आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची गोव्याच्या विधानसभेत जाऊन सकाळी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाली. राफेल प्रकरणी पर्रिकरांकडे महत्वाची माहिती आहे, असा दावा नुकताच राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पर्रिकर यांची भेट घेतल्याने ही भेट चर्चेचा विषय झाली आहे.


राहुल गांधी यांनी ट्विट करुन आपण पर्रिकर यांची भेट घेतल्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा दिल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच ही वैयक्तिक भेट असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. दरम्यान, राहुल गांधी यांनी गोव्यातील काँग्रेसच्या १२ आमदारांची धावती भेट घेतली.

पर्रिकरांवर टिप्पणी करताना राहुल गांधींनी म्हटले होते की, एका ऑडिओ टेपमध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि एका पत्रकारामध्ये संवाद झाला आहे. यामध्ये राणे पत्रकाराला सांगत आहेत की, पर्रिकरांनी आपल्या निवासस्थानी राफेलप्रकरणाची एक फाईल असल्याचे कॅबिनेटला सांगितले आहे. ही टेप माध्यमांसमोर आल्यानंतर राणेंनी याचा इन्कार केला आहे, तसेच ही ऑडिओ टेप बनावट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी चौकशीची मागणीही राणेंनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 2:22 pm

Web Title: rahul gandhi visited goa cm manohar parrikar to wish him a speedy recovery
Next Stories
1 भारतीय जवानांचे प्राण वाचवण्यासाठी त्याने तयार केले भूसुरुंग शोधून निकामी करणारे ड्रोन
2 जॉर्ज फर्नांडिस: पाद्री होण्यास निघाले अन् नेता झाले
3 पंतप्रधान मोदींनीच विचारले; तुमचा मुलगा पबजी खेळतो का?
Just Now!
X