ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लमीन (एआईएमआईएम) चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी रविवारी हैदराबाद येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत भाजपामुळे नाहीतर स्थानिक राजकीय पक्षांमुळे अनेक राज्यांध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. राहुल स्वतः अमेठीतून हारले मात्र वायनाडमधुन जिंकले कारण या ठिकाणी ४० टक्के मुसलमान राहतात.

ओवैसीने उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, तुम्ही काँग्रेस व अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांना सोडू इच्छित नाहीत, मात्र हे लक्षात ठेवा त्यांच्याकडे ताकद नाही व ते कष्टही करत नाहीत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या ज्येष्ठांना वाटले असेल की नवीन भारताची निर्मिती होईल. भारत गांधी, नेहरू, आंबेडकर,आझाद व त्यांच्या कोट्यावधी अनुयायांचा होईल. मला अजुनही माझा हक्क मिळेल अशी आशा आहे. आम्हाल भीक नकोय, आम्ही कोणावरही विसंबुनही राहू इच्छित नाही.

या अगोदर ओवैसींनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधत म्हटले होते की, मुसलमान देशाचे भाडेकरू नाहीत, तर भागधारक आहेत.