News Flash

रेल्वेतील कामगिरी आढाव्यात कर्मचारी कपातीचा हेतू नाही

सक्तीच्या निवृत्तीच्या चर्चेनंतर रेल्वेचे स्पष्टीकरण

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वेने विभागीय कार्यालयांना कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सांगितले असले, तरी पंचावन्न वयावरील व तीस वर्षे सेवा झालेल्या कामगारांना काढून टाकण्याचा किंवा त्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा कुठलाही विचार नाही असे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. रेल्वे विभाग हा अनेक कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यावर हे स्पष्टीकरण करण्यात आले.

रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे आस्थापना संहितेनुसार लोकहितासाठी कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक असते. त्यानुसार रेल्वे विभागांना तशी पत्रे पाठवून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे पण तसे नेहमीच केले जाते. गेल्या वर्षीही असा कामगिरीचा आढावा घेण्यात आला होता. कामगिरीच्या आढाव्या आधारे पंचावन्न वयावरील व तीस वर्षे सेवा झालेल्या कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार असल्याचे वृत्त खरे नाही. रेल्वेने असे म्हटले आहे, की त्यांनी विविध विभागात २०१४-२०१९ या काळात १,८४,२६२ कर्मचाऱ्यांची भरती केली होती. आता रेल्वेतील १,४१,०६० पदांसाठी परीक्षा व भरती प्रक्रिया सुरू आहे. ती पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. एकूण २,८३,६३७ पदे यात भरली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 1:17 am

Web Title: railway explanation after forced retirement discussion abn 97
Next Stories
1 देशभरातील मुस्लीम माता-भगिनींचा विजय – पंतप्रधान मोदी
2 जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
3 तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणे ही भारताच्या परिवर्तनाची सुरुवात – रवी शंकर प्रसाद
Just Now!
X