सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या पाश्र्वभूमीवर भारतीय रेल्वे पुन्हा एकदा प्रवासी भाडेवाढ करण्याच्या विचारात आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात ‘इंधन दरवाढ आढावा घटका’चा विचार करून नेमकी किती दरवाढ करायची याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
वाहतूक तसेच प्रवासी भाडे निश्चित करण्यासाठी सदर घटकाचा आढावा दर सहा महिन्यांनी घेतला जातो. त्यादृष्टीने ऑक्टोबर महिन्यात भाडेवाढ अपेक्षित असून उपरोक्त घटकाचा विचार करता, प्रवासी भाडय़ाच्या रकमेत २ ते ३ टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज आहे. तसेच तोपर्यंत ‘रेल्वे दर प्राधिकरण’ कार्यान्वित होईल असा अंदाज आहे.