रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या मुलावर त्याच्याच साखरपुडय़ाच्या दिवशी एका कन्नड अभिनेत्रीने बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. गौडा यांचे पुत्र कार्तिक याच्याशी आपला विवाह झाला असून, गौडा कुटुंबीयांनी आपल्याला सून म्हणून स्वीकार करावे, असे या अभिनेत्रीने सांगितले. कार्तिक गौडा यांनी आपण या अभिनेत्रीला ओळखत नसल्याचे सांगितले, मात्र कार्तिक गौडा हे मे महिन्यापासून आपल्याला चांगले ओळखत आहेत. जूनमध्ये आम्ही विवाह केला, त्या वेळी कार्तिक यांचा वाहन चालकही उपस्थित होता, असे या अभिनेत्रीने सांगितले. कार्तिकसोबतची काही छायाचित्रेही या अभिनेत्रीने दाखविली, मात्र ही छायाचित्रे बनावट असल्याचा आरोप गौडा कुटुंबीयांकडून करण्यात आलेला आहे. ‘‘ही छायाचित्रे बनावट नसून कार्तिक यांच्या मित्रानेच ती टिपली असून, त्यानंतर ती मला पाठविली,’’ असे ही अभिनेत्री म्हणाली.दरम्यान, हे प्रकरण महिला आयोगाकडे गेले असून, कार्तिक यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची सूचना या अभिनेत्रीला केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 29, 2014 12:18 pm