रेल्वेमध्ये अपारंपारिक ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे. रेल्वेला अपारंपारिक स्रोतांपासून मिळणारी ऊर्जा वाढवायची आहे. सौर उर्जेपासून १,००० मेगावॅट आणि पवन ऊर्जेपासून २०० मेगावॅट वीजेचा वापर करायचे रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट असल्याचे सुरेश प्रभूंनी सांगितले. काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त अपारंपारिक ऊर्जेचा वापर करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि पीयूष गोयल यांची काल एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. २०२५ पर्यंत रेल्वेमध्ये अपारंपारिक ऊर्जा स्रोतांपासून मिळालेल्या ५ गीगावॅट वीजेचा वापर केला जाईल असे सुरेश प्रभूंनी म्हटले. यासाठी ३.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाईल असे त्यांनी म्हटले.

रेल्वेला वाहतुकीचे क्लीन आणि ग्रीन साधन बनवण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी म्हटले. अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतापासून १,२०० मेगावॅट वीज वापरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या आम्ही ३६ मेगावॅट वीजेपर्यंत वापर करतो असे ते म्हणाले. डिकार्बनायजिंग इंडियन रेल्वे या नावाने एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अपारंपारिक स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचा वापर ५ गीगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट या अहवालात ठरवण्यात आले आहे. रेल्वेनी विकासाचे ग्रीन व्हावे अशी असा आमचा मनोदय आहे असे सुरेश प्रभूंनी या अहवालाचा संदर्भ देऊन म्हटले. येत्या काळात जास्तीत जास्त रेल्वे या वीजेवर चालतील असे ते म्हणाले. यासाठी आम्ही काही उद्दिष्टे ठरवली आहेत. पुढील १० वर्षांमध्ये संपूर्ण रेल्वे ट्रॅक हे विद्युत शक्तीला जोडलेले असतील असे ते म्हणाले. पुढील पाच वर्षांमध्ये ९० टक्के रेल्वे ट्रॅक हे इलेक्ट्रिक असतील असे ते म्हणाले. जर देशातील सर्व रेल्वे ट्रॅक हे इलेक्ट्रिक झाले तर ४१,००० कोटी रुपयांची बचत होईल असे पीयुष गोयल यांनी म्हटले आहे. या उद्दिष्टाला त्यांनी मिशन ४१ के असे म्हटले आहे.