केरळमध्ये सध्या अतिवृष्टीने हाहाकार माजला असून १०० पेक्षा अधिक लोकांचा या आपत्तीत मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या नाले ओसंडून वाहत असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी येथे होणाऱ्या रेल्वे भरती बोर्डाच्या परिक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागाने याबाबत माहिती दिली आहे.


केरळमध्ये शुक्रवारी होणाऱ्या रेल्वेच्या परिक्षेला सुमारे २७,००० हजार उमेदवार पात्र ठरली आहेत. देशातील विविध भागातून येथे परिक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन शिफ्टमध्ये काम चालणार होतं. मात्र, आता या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कारण, केरळात सध्या पावसाने चांगलेच झोडपूण काढले आहेत.

मुसळधार पावसामुळे राज्यावर आलेल्या संकटाची परिस्थिती पाहता रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर कधी ही परिक्षा घेतली जाईल याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. एकूणच केरळची पूर संकटातून मुक्तता झाल्यानंतरच या परिक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे.