News Flash

खूशखबर ! ४७ रेल्वेंमधील ‘फ्लेक्सी फेअर’ बंद

१५ रेल्वेंची फ्लेक्सी फेअर योजना संपूर्णपणे बंद तर ३२ रेल्वेंमध्ये आंशिक पद्धतीने फ्लेक्सी स्कीम हटवण्यात आली आहे.

फ्लेक्सी फेअर लागू केल्यानंतर अनेक रेल्वेच्या सीट्स रिकाम्या राहत.

रेल्वेने दिवाळीपूर्वी ४७ एक्स्प्रेसच्या फ्लेक्सी फेअर योजना संपुष्टात आणल्या आहेत. यामधील १५ रेल्वेंची फ्लेक्सी फेअर योजना संपूर्णपणे बंद केली आहे. या रेल्वेंचे मागीलवर्षी सरासरी मासिक बुकिंग ५० टक्क्यांहून कमी होते. तर ३२ रेल्वेंमध्ये आंशिक पद्धतीने फ्लेक्सी स्कीम हटवण्यात आली आहे. या ३२ रेल्वेंमध्ये फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्टमध्ये फ्लेक्सी योजनेप्रमाणे भाडे आकारण्यात येणार नाही.

त्याचबरोबर ज्या रेल्वेंमध्ये फ्लेक्सी फेअर वसूल केले जाते. तिथे आता तिकीट मुल्याच्या १.५ ऐवजी १.४ टक्के अधिक भाडे लागेल. जर गाडी सुटण्यापूर्वी ४ दिवस आधीपर्यंत ६० टक्केहून कमी बुकिंग असेल तर फ्लेक्सी फेअरमध्ये २० टक्के सूट मिळेल. तर बुकिंग ७० टक्क्यांहून अधिक असेल तर १० टक्के सूट मिळेल. बुकिंग ८० टक्के असेल तर काहीच सूट मिळणार नाही.

ज्या ३२ रेल्वेंमध्ये आंशिक पद्धतीने फ्लेक्सी फेअर योजना हटवण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांना १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल. या रेल्वेंमध्ये जर ६० टक्क्यांहून कमी बुकिंग असेल तर २८ टक्के सूट मिळेल. सध्या प्रायोगिक तत्वावर ही योजना ६ महिने लागू राहील. त्यानंतर त्याची समीक्षा केली जाईल.

त्याचबरोबर या ३२ रेल्वेतून आंशिक पद्धतीने फ्लेक्सी फेअर योजना हटवण्यात आली आहे. यामध्ये फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्ट महिन्यात तिकीट बुकिंग केल्यानंतर फ्लेक्सी फेअर लागणार नाही. या रेल्वेचे मागील वर्षी सरासरी ५० ते ७५ टक्के आसन बुक झाले होते.

रेल्वेने राजधानीच्या ४४, दुरांतोच्या ५३ आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या ४५ प्रीमियम एक्स्प्रेसला फ्लेक्सी फेअर योजना लागू केली होती. यामध्ये ज्याप्रमाणे आसन भरत जातील तसे भाडे वाढत जाते. या रेल्वेचे भाडे जास्त झाल्याने लोक विमानांना पसंती देऊ लागले होते. फ्लेक्सी फेअर योजना बंद केल्याने जास्त आसन बुक होतील, अशी रेल्वेला आता अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:19 pm

Web Title: railway removes flexi fares from 47 trains
Next Stories
1 काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाकडून पंतप्रधानांवर आक्षेपार्ह ट्विट
2 लग्नानंतर झाली HIVची लागण, पतीच्या मृत्यूनंतर सासरच्यांनीही हाकललं
3 …आणि राहुल गांधींसमोर ज्योतिरादित्य सिंदिया-दिग्विजय सिंह भिडले
Just Now!
X