News Flash

ट्रेनमध्ये टॉयलेटच्या पाण्याचा चहा, कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड

रेल्वे प्रवासादरम्यान घेतलेल्या खाद्यपदार्थांच्या शुद्धतेबाबत विचार केला का? कधी केला नसेल तर आतापासून कदाचित करायला सुरुवात कराल. कारण,

रेल्वे प्रवासामध्ये अनेकदा तुम्ही विक्रेत्यांकडून थकाव घालवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेतली असेल. पण, प्रवासादरम्यान घेतलेल्या खाद्यपदार्थांच्या शुद्धतेबाबत विचार केला का? कधी केला नसेल तर आतापासून कदाचित करायला सुरुवात कराल. कारण, काही दिवसांपासून ट्रेनमध्ये चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डिसेंबर २०१७ मधील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता रेल्वेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. चहा कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्स्प्रेसमध्ये सिकंदराबाद स्थानकाजवळ एक चहा विक्रेता प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफीसाठी टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदार पी. शिवप्रसादला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी उमा शंकर कुमार यांनी दिली. व्हिडीओत दिसणारा चहा विक्रेता शिवप्रसाद यांच्याकडे काम करतो. या व्हिडिओमध्ये चहा विक्रेत्यासोबतच दोन फेरीवालेससुद्धा दिसत आहेत. मात्र, ते अधनिकृत फेरीवाले असल्याचा दावा रेल्वेनं केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 10:18 am

Web Title: railway vendor fined rs 1 lakh after in a viral video people were seen bringing out teacoffee cans from inside a train toilet at secunderabad
Next Stories
1 डेटाचोरीच्या संशयावरुन ऑनलाइन ईपीएफ स्थगित
2 आरक्षण हे कलंक; ‘या’ राज्यातील दलित समाजाची अनोखी मोहीम
3 उत्तराखंडमध्ये ढगफुटी! घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान, गाड्याही गेल्या वाहून
Just Now!
X