08 March 2021

News Flash

रेल्वे कामगार संघटनांचा ११ जुलैपासून बेमुदत संप?

नवी निवृत्तिवेतन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फेरआढावा घ्यावा

| June 9, 2016 12:02 am

नवी निवृत्तिवेतन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फेरआढावा घ्यावा यासह विविध मागण्यांसाठी येत्या ११ जुलैपासून रेल्वेतील कामगार बेमुदत संप पुकारणार असल्याचा इशारा रेल्वेतील संघटनांनी दिला आहे.
या बाबत गुरुवारी रेल्वे प्रशासनाला नोटीस पाठविण्यात येणार आहे, ११ जुलै रोजी सकाळी ६ वाजल्यापासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे, असे अखिल भारतीय रेल्वेमन्स महासंघाचे सरचिटणीस एस. गोपाळ मिश्रा यांनी सांगितले.
आम्ही सहा महिन्यांपूर्वी आमच्या मागण्या सरकारसमोर ठरवल्या मात्र सरकारच्या नकारात्मक वर्तणुकीमुळे संप पुकारणे अपरिहार्य ठरले आहे, सरकारच्या सूचनेवरून आम्ही एप्रिल महिन्यात पुकारण्यात येणारा संप पुढे ढकलला होता, असेही मिश्रा म्हणाले.
रेल्वेत जवळपास १३ लाख कर्मचारी असून कोणत्याही प्रकारच्या संपामुळे गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडणार असून त्याचा फटका देशभरातील जनतेला बसणार आहे.
नवी सेवानिवृत्तिवेतन योजना आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फेरआढावा घेण्यासह रिक्त पदांची भरती करण्याचीही मागणी संघटनांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 12:02 am

Web Title: railway workers strike
Next Stories
1 दहशतवादाला पोसणाऱयांविरोधात कडक पावलं उचलण्याची वेळ आली- नरेंद्र मोदी
2 सोनिया गांधींविरोधात बिल्डरचे पैसे थकविल्याप्रकरणी एफआयआर दाखल
3 सूरतमध्ये देवाच्या मूर्तीला घातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश!
Just Now!
X