17 January 2021

News Flash

तिकीट रद्द करण्यासंबंधी रेल्वेचा मोठा निर्णय; रेल्वे सुटण्यापूर्वी…

रेल्वेच्या नियमांमध्ये आजपासून करण्यात आले बदल

संग्रहीत प्रतिकात्मक

भारतीय रेल्वेने आजपासून (१० ऑक्टोबर) तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता प्रवाशांसाठी एक खास सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. प्रवशांना आता रेल्वे स्थानकामधून निघण्याच्या पाच मिनिटं अगोदरपर्यंत त्यांचे तिकीट बुक किंवा रद्द करता येणार आहे. १० ऑक्टोबरपासून ज्या विशेष रेल्वे सुरू होत आहेत, त्या सर्व रेल्वेंसाठी हा नियम लागू असणार आहे.

तसेच, आता तिकीट बुकींगचा दुसरा चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या अर्धातास (३० मिनिंट) अगोदर जाहीर केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने स्थानकांमधून रेल्वेंच्या ठरलेल्या निघण्याच्या वेळेच्या अर्धातास अगोदर दुसरा बुकींग चार्ट तयार करण्याच्या मागील प्रणालीस आजपासून (१० ऑक्टोबर) लागू करण्याच निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत करोना महामारीमुळे हा कालावधी रेल्वे निघण्याच्या दोन तास अगोदर असा केला गेला होता.

रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे की, कोविड-19 च्या अगोदर नियमांनुसार पहिला बुकींग चार्ट रेल्वे स्थानकातून निघण्याच्या ठरलेल्या वेळेच्या किमान चार तास अगोदर तयार केला जात होता. जेणेकरून उपलब्ध असलेल्या जागा दुसरा बुकींग चार्ट तयार होईपर्यंत, अगोदर या अगोदर जागा मिळवा या आधारावर पीआरएस काउंटर आणि इंटरनेटच्या माध्यमातून बुक करता येतील.

भारतीय रेल्वेने २५ मार्चपासून देशभराती लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद केल्या होत्या. नंतर त्यांना टप्प्याटप्प्याने सुरू केले गेले. ज्याची सुरूवात १ मे रोजी स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यांमध्ये पोहचवण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू करण्यापासून झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 8:38 am

Web Title: railways big decision to cancel tickets msr 87
Next Stories
1 मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन
2 काळ्या पैशांविरोधात केंद्र सरकारला मोठं यश; स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी
3 स्विस खात्यांच्या तपशिलाचा भारताला दुसरा संच 
Just Now!
X