एप्रिल ते जुलै दरम्यान भारतीय रेल्वेला सरासरी १०० रूपये कमावण्यासाठी किती खर्च झाला असेल माहितीये? तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल पण भारतीय रेल्वेला एप्रिल ते जुलै दरम्यान १०० रूपये कमावण्यासाठी १११.५१ रूपयांचा खर्च करावा लागला आहे. त्यामुळे रेल्वेचा आतबट्ट्या व्यवहार पुन्हा एकदा समोर आला आहे. दररोजच्या कामगारांना द्यावे लागणारे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी लागणारी वाढीव पेन्शनचा खर्च यामुळे रेव्लेला उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाला आहे. या सर्व खर्चाचे गणित व्यवस्थित न जुळाल्यामुळे रेल्वेला ठरवलेले लक्ष पूर्ण करता आले नाही.

उत्पन्नापेक्षा रेल्वेचा खर्चच आधिक होत आहे म्हणजेच रेव्लेची कमाई व्यवस्थित होत नाही. ठरवलेली कमाई न झाल्यामुळे रेल्वाचा महसूल वाढत नाही. महसूलन वाढल्यामुळे रेल्वेला नवे जाळे आणि बोगी बनवता येत नाही. रेल्वेच्या अर्थ विभागाच्या आकडेवारीनुसार, पहिल्या चार महिन्यांमध्ये प्रवाशांकडून १७, ७३६.०९ कोटी रूपयांचे उत्पन्न करण्याचे लक्ष रेव्लेने ठेवले होते. मात्र या चार महिन्यांमध्ये रेल्वेला १७, २७३.३७ कोटी रूपयेच कमावता आले.

२०१८ च्या रेव्ले अर्थसंकल्पामध्ये एप्रिल ते जुलै दरम्यान प्रवाशांकडून ३९, २५३.४१ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवण्याचे लक्ष ठेवले होते मात्र ३६, ४८०.४१ कोटी रूपयेच कमावले. एप्रिल-जुलै दरम्यान एकूण कमाईचे लक्ष ६१,९०२ कोटी रूपये ठेवले होते. पण रेल्वेला हे लक्ष पूर्ण करता आले नाही. या चार महिन्यात रेल्वेला ५६,७१७.८४ कोटी रूपयांपर्यंत पोहचले. अर्थसंकल्पामध्ये रेल्वेने या चार महिन्याचा खर्च ५०,४८७.३६ कोटी ठरवला होता. पण रेल्वेचा खर्च ५२,५१७.७१ कोटी रूपये खर्च झाला. रेल्वे आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कामकाजाच्या खर्चाशिवाय इतर अनेक जाही रेव्लेचा पैसा खर्च होतोय. त्यामुळे खर्च वाढला आहे. कामगारांना द्यावे लागणारे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावी लागणारी वाढीव पेन्शनचा खर्च यामुळे रेव्लेला उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाला आहे