तुम्हाला रेल्वेतून प्रवास करायचा असेल तर आजवर तुम्ही सेकंड एसी, थर्ड एसी किंवा अगदी फर्स्ट क्लासमधून प्रवास केला असेल. मात्र आता तुम्हाला त्याहीपेक्षा आरामदायक प्रवास करायचा असेल तर तुम्ही सलून बुक करू शकता. सलुन म्हणजे एक टू बीएचके फ्लॅटच असणार आहे. ज्यामध्ये ड्रॉईंग रुम, टॉयलेट, बाथरुम आणि दोन बेडरुम असणार आहेत. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आत्तापर्यंत फक्त प्रथम श्रेणी अधिकारी आणि त्यावरील अधिकारी, मंत्री यांच्यासाठी असणारी ही सुविधा सर्वांसाठी खुली करण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वेनं कायम उत्तम सेवा-सुविधा दिली पाहिजे अशी अपेक्षा असते. त्याचमुळे सलून्स अर्थात रेल्वेतले असे आरक्षित कोचेस सर्वांसाठी खुले करण्याचे आदेश पियुष गोयल यांनी दिले आहेत. दोन सलून्स अर्थात टू बीएचके फ्लॅटसारखे कोचेस सामान्य प्रवाशांना खुले करण्यात यावेत असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. ज्या प्रवाशांना हे लक्झरी सलून्स हवे आहेत त्यांना त्याचे शुल्क अदा करावे लागणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आयआरसीटीसीला या संदर्भातले निर्देश दिले आहेत. सध्या रेल्वेकडे ३३६ सलून कार्स आहे. ज्यापैकी ६२ एअर कंडिशन आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.