News Flash

आग्रा येथील मनोरुग्णालयात शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ

उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून केवळ नुकसानीचे दृश्य पाहून ३३ शेतक ऱ्यांनी प्राण गमावले असतानाच आता तेथील शेतक ऱ्यांमध्ये

| April 18, 2015 02:25 am

उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाने शेतक ऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून केवळ नुकसानीचे दृश्य पाहून ३३ शेतक ऱ्यांनी प्राण गमावले असतानाच आता तेथील शेतक ऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे अनेक शेतकरी मानसोपचारासाठी आग्रा येथील मनोरुग्णालयात जात आहेत. आग्रा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटल या संस्थेला भेट देणाऱ्यांच्या संख्येत गेल्या एक महिन्यात ३३ टक्के वाढ झाली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन रुग्णांमध्ये शेतक ऱ्यांचा जास्त समावेश असून पिकांच्या नुकसानीने त्यांना नैराश्य आले आहे. या शेतक ऱ्यांना कर्ज फेडणेही मुश्कील झाले आहे. शेतक ऱ्यांमध्ये आत्महत्येची लक्षणे दिसत आहेत व इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटल ही संस्था आता शेतक ऱ्यांवर उपचारासाठी खास केंद्र सुरू करणार आहे. काही डॉक्टर्स खेडय़ात जाऊन शेतक ऱ्यांची  तपासणी करणार आहेत व त्यांना घरी जाऊन उपचार देणार आहेत.
संस्थेचे संचालक सुधीर कुमार यांनी सांगितले, की एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण आम्ही प्रथमच पाहत आहोत. आमच्या खेडय़ांमध्ये सामाजिक व्यवस्था चांगली असतानाही शेतकरी हे धक्के पचवण्यास असमर्थ ठरत आहेत, आताच्या परिस्थितीत सर्वानी शेतक ऱ्यांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे सांगून दिलासा दिला पाहिजे. समाजाने त्यांना टाकून दिल्याची भावना निर्माण होता कामा नये. घरातील व्यक्तींनीही ताणतणावांबाबत जागरूक राहिले पाहिजे. इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अँड हॉस्पिटल या संस्थेत रोज ओपीडीमध्ये ३०० रुग्ण येतात, गेल्या महिन्यात ही संख्या ४०० झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 2:25 am

Web Title: rain hit farmers line up for help at agra mental institute
Next Stories
1 राहुल यांची आज शेतकऱ्यांशी चर्चा
2 मध्य प्रदेशच्या राज्यपालांविरोधातील एफआयआरला अंतरिम स्थगिती
3 न्यायाधीशांवरील कारवाईची ‘अंतर्गत प्रक्रिया’नागरिकांसाठी खुली
Just Now!
X