News Flash

मुसळधार पावसामुळे इराकमध्ये हाहाकार

बगदादमधील पायाभूत सुविधांच्या खराब अवस्थेमुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर पूरस्थिती ओढवली आहे.

मुसळधार पावसामुळे इराकच्या अनेक भागांत हाहाकार माजला असून बगदादमधील अनेक ठिकाणी कमरेभर उंचीइतके पाणी तुंबल्याने विस्थापितांच्या छावण्यांना त्याचा फटका बसला आहे.
बगदादमधील पायाभूत सुविधांच्या खराब अवस्थेमुळे इतक्या मोठय़ा प्रमाणावर पूरस्थिती ओढवली आहे. पुरामुळे झालेल्या अवस्थेची छायाचित्रे समाजमाध्यमांवर सातत्याने प्रसारित करण्यात येत असून त्यामुळे स्थिती किती भीषण आहे त्याची कल्पना येत आहे. या स्थितीमुळे चाकरमान्यांना कार्यालयात जाणे अशक्य झाल्याने सरकाला गुरुवारी सुटी जाहीर करणे भाग पडले आहे. बगदादमधील एका हॉस्पिटलमधील कर्मचारी गुडघ्याइतक्या उंचीच्या पाण्यातून वाट काढताना एका छायाचित्रात दिसत आहे. काही नागरिकांना, गटाराचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने निराळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 12:29 am

Web Title: rain in iraq
टॅग : Iraq
Next Stories
1 शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा ‘आकाशवाणी’ मार्ग
2 आता चीनमध्येही हम दो, हमारे दो…
3 मला भारतात परतायचंय – छोटा राजन
Just Now!
X