देशात यंदा सर्वसाधारण पाऊस असण्याची शक्यता स्कायमेट या हवामान संस्थने वर्तवली आहे. कमी पाऊसमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असून याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो तसेच त्यामुळे महागाईतही वाढ होण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा सरासरी ९३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर पाऊस कमी असेल तर कर्जाच्या ओझ्याखाली बुडालेल्या शेतकऱ्यांसाठी हा दुहेरी फटका असेल. यामुळे आर्थिक स्थितीवरच नव्हे तर महागाईतही वाढ होण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा सरासरी ९३ टक्के पाऊस राहण्याची शक्यता आहे. सरासरी ९० ते ९५ टक्के पाऊस हा सर्वसाधारणपेक्षाही कमी पावसाच्या श्रेणीमध्ये येतो. १९५१ ते २००० च्या दरम्यान झालेल्या एकूण पावसाची सरासरी ८९ सेमी आहे.

स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी सांगितले की, सर्वसाधारण पेक्षा कमी पावसामागे अल-निनोचा प्रभाव हे कारण असणार आहे. यापूर्वी स्कायमेटने सर्वसाधारणपेक्षा ५५ टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या वर्षी मान्सूनचा पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या हवामान विभागाने गेल्या महिन्यात सांगितले होते की, या वर्षी पाऊस चांगला राहण्याची शक्यता आहे. त्यावेळी अल-नीनोच्या प्रभावाबाबत भाष्य करण्यात आले नव्हते.