05 April 2020

News Flash

Coronavirus : उपजिल्हाधिकारी महिलेने पुढे ढकलले लग्न

करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन छत्तीसढ येथील रायपूरच्या उपजिल्हाधिकारी शीतल बन्सल यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे. भारतीय वन विभागात काम करणारे अधिकारी आयुष आणि शीतल बन्सल यांचं लग्न आज होणार होतं. मात्र ते पुढे ढकलण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शीतल बन्सल यांनी ही माहिती दिली. आम्ही जर आज लग्न केलं तर समाजासमोर ते एक चुकीचं उदाहरण ठरेल. करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा धोका टाळण्यासाठी गर्दी न होऊ देणं सगळ्यांच्या हिताचं आहे. नेमक्या याच कारणामुळे आम्ही आमचं लग्न पुढे ढकलत आहोत असंही त्या म्हणाल्या.

देशभरात ६०० पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. काही जणांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश लॉकडाउन आहे. लग्न समारंभही मोजक्या लोकांमध्ये आटपा किंवा लग्न पुढे ढकला असं आवाहन सरकारतर्फे आधीच करण्यात आलं होतं. आता ते आवाहनही लोक पाळत आहेत हेच या उदाहरणावरुन दिसून येतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 10:04 am

Web Title: raipur deputy collector sheetal bansals wedding with ifs officer aayush postponed due to coronavirus outbreak scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 महिन्यात दोनदा पगार : ३० हजारांपेक्षा कमी वेतन असलेल्यांसाठी रिलायंसची घोषणा
2 Lockdown: मुलाला त्याने खांद्यावर बसवलं, कुटुंब करणार १५० किमीचा पायी प्रवास
3 Coronavirus: एकही भारतीय उपाशी झोपणार नाही; केंद्र सरकारचं मोठं पाऊल
Just Now!
X