News Flash

इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत रइसी यांचा विजय

माजी अध्यक्ष महम्मद अहमेदिनेजाद यांनीही मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. ते कट्टरवादी समजले जातात.

तेहरान : इराणच्या न्यायप्रणालीचे प्रमुख आणि कट्टरवादी नेते इब्राहिम रइसी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. त्यामुळे देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची नागरी सत्तेवरील पकड घट्ट झाली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वात कमी मतदान झाले आहे.  प्राथमिक निकालानुसार, रइसी यांना एक कोटी ७८ लाख मते मिळाली आहेत. खामेनी यांचे नियंत्रण असलेल्या समितीने रइसी यांच्या विरोधातील प्रमुख उमेदवारांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवून त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केल्याचे मानले जाते. त्यामुळे नागरिकांनी मतदानाकडे मोठ्या प्रमाणावर पाठ फिरविली. माजी अध्यक्ष महम्मद अहमेदिनेजाद यांनीही मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. ते कट्टरवादी समजले जातात.

प्राथमिक निकालानुसार रिव्होल्युशनरी गार्डचे माजी कमांडर मोहसिन रेझाई यांना ३३ लाख, तर मध्यममार्गी नेते अब्दोलनासेर हेमती यांना २४ लाख मते मिळाली आहेत. इराणच्या अंतर्गत मंत्रालयातील निवडणूक मुख्यालयाचे प्रमुख जमाल ओर्फ यांनी ही माहिती दिली. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील चौथे उमेदवार अमीरहुसेन गझिझादेह हाशेमी यांना १० लाख मतदारांनी पसंती दिली, असे ओर्फ यांनी सांगितले. शनिवारी हाशेमी यांनी इससी यांचे अभिनंदनही केले.

रेझाई यांनी ट्विटरवरील संदेशात खामेनी यांची प्रशंसा केली असून मतदारांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:01 am

Web Title: raisi wins iran presidential election akp 94
Next Stories
1 भारतीय लष्करी अधिकारी समजून पाकच्या ISI ने केला हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न; मात्र ती व्यक्ती निघाली….
2 कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या महिलेला ५ मिनिटांत दिली कोव्हॅक्सिन लस; अधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश
3 Central Vista : संसदेची प्रकल्पाला मान्यता, सरकारच्या आग्रहाचा प्रश्न येतोच कुठे – ओम बिर्ला
Just Now!
X