महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘ईव्हीएम’च्या संदर्भात झालेल्या वादावरून सोमवारी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. लोकसभा निकालनंतर व निकालअगोदरही काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासर्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मनसेने देखील याबाबत शंका उपस्थित केली होती.

याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ आल्या असुन या तोंडावर पुन्हा एकादा ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत येत आहे. विधनासभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात येऊ नये अशी मागणी राज ठाकरे करणार असल्याची माहिती आहे.

ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्याबाबत दिवसेंदिवस होणारा विरोध वाढताना दिसत आहे. याचसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. निवडणुका बॅलेट पेपरने घेण्यासंदर्भातील याचिका मनोहर शर्मा यांनी दाखल केली होती. सत्ताधारी भाजप ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील २१ विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील ५० टक्के मतांच्या मोजणीची मागणी केली होती.