18 January 2019

News Flash

आयत्या बळावर : पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणारं राज ठाकरे यांचं आणखी एक व्यंगचित्र

राज ठाकरेंनी पुन्हा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

राज ठाकरेंनी पुन्हा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे संभाजी भिडेंच्या आंब्यासंदर्भातल्या टिप्पणीवरही राजनी मार्मिक चित्र रेखाटलं आहे. राज यांनी त्यांच्या फेसबुकवर पेजवर हे व्यंगचित्र दिलं असून मनसेनंही ट्विटरच्या माध्यमातून ते शेअर केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगधार्जिणे असल्याचं सांगताना स्पर्धापरीक्षांमधून उत्तीर्ण होणाऱ्या आएएस अधिकाऱ्यांपेक्षा उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्यांचा सन्मान होत असल्याचे राजनी व्यंगचित्रातून सूचित केले आहे. तसेच संभाजी भिडेंच्या बागेतले आंबे खाल्याने मूल होतं या वक्तव्याची सोशल मीडियात यथेच्छ खिल्ली उडाल्यानंतर राजनीही व्यंगचित्रातून फटकारे काढल्याचे दिसत आहे.

First Published on June 13, 2018 6:38 pm

Web Title: raj thackrey cartoon prime minister narendra modi