News Flash

पाश्चिमात्य देशांवर राजपक्षे यांची टीका

लटीटीई या संघटनेवर निर्णायक विजय मिळविण्याच्या घटनेस रविवारी पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा विजयोत्सव साजरा करण्यापासून दूर राहणाऱ्या देशांवर श्रीलंकेचे अध्यक्ष महिन्द्र राजपक्षे यांनी टीका

| May 19, 2014 06:06 am

एलटीटीई या संघटनेवर निर्णायक विजय मिळविण्याच्या घटनेस रविवारी पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा विजयोत्सव साजरा करण्यापासून दूर राहणाऱ्या देशांवर श्रीलंकेचे अध्यक्ष महिन्द्र राजपक्षे यांनी टीका केली आहे. हे देश ‘अंध, बहिरे आणि मूक’ असल्याची तोफ राजपक्षे यांनी डागली आहे. तामिळी वाघांशी सुरू असलेले युद्ध २००९ मध्ये संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेने केलेल्या प्रगतीचीही दखल या देशांनी घेतलेली नाही, असे ते म्हणाले.
एलटीटीईविरोधातील कारवाईस पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर श्रीलंकेच्या दक्षिणेकडील मातारा या सिंहलींच्या मुख्य प्रदेशात एक विजय सोहळा आयोजित करण्यात आला होता. आम्ही हा विजय साजरा करीत आहोत, परंतु काही देश मुके, आंधळे आणि बहिरे झाले असून त्यामुळेच या घटनेकडे त्यांचे लक्ष गेल्याचे दिसत नाही, या शब्दांत राजपक्षे यांनी शरसंधान केले. या कार्यक्रमास कॅनडासह बहुतेक देशांचे राजदूत अनुपस्थित राहिले होते.
असा विजयोत्सव साजरा करू नये, असे मत काही देशांनी व्यक्त केलेले असतानाही हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही शांततेचा विजय साजरा करीत आहोत, युद्धाचा विजय नव्हे, असेही राजपक्षे यांनी स्पष्ट केले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संचलनात लष्कराचे आठ हजारांहून अधिक सैनिक सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 6:06 am

Web Title: rajapaksa slams nations staying away from victory celebrations
Next Stories
1 दूतावासांवरील हल्ल्यांचा कट आखण्याच्या प्रकरणात मलेशियाकडून माहिती घेणार
2 सुब्रतो रॉय यांचा ‘तिहार’ मुक्काम कायम; ठोस प्रस्ताव देण्याचे आदेश
3 आईवर अंत्यसंस्कारासाठी तेजपाल यांना जामीन मंजूर
Just Now!
X