19 January 2021

News Flash

धावत्या बसमध्ये घुसला ८० फुटांचा गॅस पाईप; प्रवाशाचं शीर झालं धडापासून वेगळं

गॅस पाईप लाइन टाकण्याचं काम सुरु असतानाच झाला अपघात

(फोटो सौजन्य : ट्विटर)

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सांडेराव पोलीस स्थानकाच्या हद्दीत मंगळवारी एक धक्कादायक दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. चार पदरी रस्त्याच्या बाजूने गॅसची पाईपलाइन टाकण्याचं काम सुरु होतं. त्याचवेळी एक ८० फुटांचा लांब पाईप दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम सुरु होतं. हायड्रॉलिक मशीनच्या ऑप्रेटरकडून झालेल्या चुकीमुळे हा ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचे डोकं आणि धड वेगळं झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एका प्रवाशाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बसमधून आरपार गेलेल्या गॅस पाईपचे फोटो पाहूनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो.

नक्की वाचा >> रस्त्याच्याकडेला उभ्या असणाऱ्या स्कॉर्पिओवर वाळूचा ट्रक पडला; आठ जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात सांडेरावपासून तीन किमी अंतरावर पालीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर झाला. या मार्गावरील चार पदरी हायवेच्या कडेला गॅस पाईपलाइन टाकण्याचं काम सुरु आहे. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मारवाड जंक्शनवरुन पुण्याच्या दिशेने एका खासगी प्रवाशी बस जात होती. त्याचवेळी हायड्रॉलिक मशीनच्या मदतीने गॅसचे ८० फुटांचे पाईप हलवणाऱ्या मशीन ऑप्रेटरने गॅसचा पाईप थेट हायवेवर आणला. रस्त्यावरुन जाणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने आणि मशीनवरील नियंत्रण सुटल्याने हायड्रॉलिक मशीनच्या क्रेनला लटकणारा पाईप थेट खासगी बसच्या खिडकीच्या काचा फोडून दुसऱ्या बाजूने बाहेर आला.

अचानक बसच्या खिडक्यांमधून मोठ्या आकाराचा पाईप आत आल्याने बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि एकच गोंधळ उडाला. बसमधून प्रवाशांच्या किंकाळण्याचा आवाज ऐकू येत होता. बसमधील भंवरलाल प्रजापत आणि मैना देवी देवासी यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही ईसाली गावाचे रहिवाशी होते. या दोघांव्यतिरिक्त १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सांडेराव पोलीस स्थानकातील अधिकारी धोलाराम परिहार यांच्यासहीत पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रावर पोहचवलं. या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2020 11:05 am

Web Title: rajastan pali tragic accident 80 feet long gas pipe rammed into bus two passengers died many injured scsg 91
Next Stories
1 “राहुल गांधी बँकॉकमध्ये कोणत्या शेतीचा अभ्यास करताहेत?”
2 “शेतकऱ्यांना अशी वागणूक मिळणार असेल तर पुरस्कारांचं काय करु?”; ३० खेळाडूंची ‘पदकवापसी’ची तयारी
3 Coronavirus : देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या उंबरठ्यावर
Just Now!
X