News Flash

राजस्थानमध्ये प्रत्येक मतदारामागे २० रुपये खर्च

राजस्थान विधानसभा निवडणुकीत मतदारांना सवरेत्कृष्ट मतदान सुविधा पुरवण्यासाठी निवडणूक आयोगाने ७५ कोटी रुपये

| November 6, 2013 04:30 am

राजस्थान विधानसभा निवडणुकीत मतदारांना सवरेत्कृष्ट मतदान सुविधा पुरवण्यासाठी निवडणूक आयोगाने ७५ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राजस्थानमध्ये चार कोटी सहा लाख मतदार असल्याने प्रत्येक मतदारामागे २० रुपये खर्च येणार आहे.
मतदान करताना मतदारांना आणि ही यंत्रणा राबवताना मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मतदारांना सवरेत्कृष्ट सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मतदारांसाठी चांगल्या प्रतीचे ईव्हीएम मशीन खरेदी करण्यात येणार आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी प्रवासी भत्ता आणि महागाई भत्ता देण्यात येणार आहे. त्याशिवाय ईव्हीएम मशीन मतदान केंद्रावर पोहोचवणे, मतदार ओळखपत्र, पेट्रोल व वाहने आणि सुरक्षा व्यवस्था यांसाठीही निधी खर्च केला जाणार आहे, असे निवडणूक आयोगाकडून कळवण्यात आले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचा खर्च प्रचंड वाढलेला आहे. २००८च्या निवडणुकीत प्रत्येक मतदारामागे १५.३४ रुपये म्हणजेच ५५.६० कोटी रुपये खर्च झाले. त्या वेळी मतदारांची संख्या तीन कोटी ६२ लाख होती. १९९३च्या निवडणुकीत मतदारांची संख्या दोन कोटी ८० लाख होती. त्या वेळी प्रत्येक मतदारामागे सहा रुपये म्हणजेच १७.१० लाख रुपये खर्च आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:30 am

Web Title: rajastan poll govt to spend rs 20 per voter for polls
Next Stories
1 ‘गोध्रा प्रकरणी मोदींचे हात कधीच धुतले जाणार नाहीत’
2 चौहान, अजयसिंह यांचे अर्ज दाखल
3 छत्तीसगडच्या सारनगड मतदारसंघात महिलांच्याच विजयाचा इतिहास
Just Now!
X