सोमवारी २६/११ मुंबई हल्ल्याला १० वर्षे झाली. याचदरम्यान निवडणुकीच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मुंबई हल्ल्यावेळी सत्तेत असताना कोणतीही कारवाई न करता काँग्रेस सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत असल्याची टीका केली. जेव्हा मुंबईत निर्दोष लोकांची हत्या होत होती. त्यावेळी देशात कोणाचे सरकार होते ?. ज्यावेळी मुंबई हल्ल्यामुळे जग हादरुन गेले होते. त्यावेळी दिल्लीत ‘मॅडमजीं’चे सरकार होते. पण तेव्हा ते निवडणुका जिंकण्याचा खेळ खेळत होते.
दहशतवाद आणि नक्षलवादावरुनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. दहा वर्षांपूर्वी २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी काँग्रेस राजस्थानमध्ये निवडणुका जिंकण्याचा खेळ खेळत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांना राजदरबारी, रागदरबारी अशी उपमा दिली. भारत कधीही २६/११ हल्ला आणि यातील गुन्हेगारांना विसरु शकणार नाही. आम्ही संधीच्या प्रतिक्षेत आहोत. कायदा आपले काम करत राहील, मी देशवासियांना पुन्हा एकदा विश्वास देतो, असे ते म्हणाले.
मोदींनी राजस्थानमध्ये तीन प्रचारसभा घेतल्या. पण २६/११ चा उल्लेख त्यांनी फक्त भिलवाडा येथील सभेतच घेतला. मुंबई हल्ल्यावेळी काँग्रेस निवडणुकीचा खेळ खेळण्यात मग्न होती. जेव्हा माझ्या देशाचे लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले तर काँग्रेसने प्रश्न उपस्थित करत व्हिडिओचा पुरावा मागितला होता, असे ते म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2018 1:09 am