राजस्थानमधल्या अलवरमध्ये झालेलं मॉब लिंचिंगचं प्रकरण अद्याप शांत झालेलं नसताना येथील भाजपाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष मदन लाल सैनी यांनी पक्षाला आणि स्वतःलाही अडचणीत टाकणारं एक विधान केलं आहे. बाबर हा हुमायूनचा मुलगा होता आणि जर भारतावर राज्य करायचं असेल तर गायीचा, ब्राम्हणांचा आणि स्त्रियांचा सन्मान कर असं मृत्यूशय्येवर असताना हुमायूनने बाबरला सांगितलं होतं असं विधान सैनी यांनी केलं आहे.
Rajasthan BJP president Madan Lal Saini claimed that when Mughal emperor Humayun was on his deathbed, he told his father, Babur, to respect cows, brahmins and women in order to continue ruling India
Read @ANI Story | https://t.co/9DR5XeE94W pic.twitter.com/Km2FyHQzyR
— ANI Digital (@ani_digital) July 25, 2018
मॉब लिंचिग प्रकरणावर माध्यमांसोबत बोलताना मदन लाल सैनी हे गायीचं महत्त्व समजावत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्या माहितीनुसार, मृत्यूच्या आधी हुमायून याने बाबरला बोलावून घेतलं आणि जर तुला भारतावर राज्य करायचं असेल तर गायीचा, ब्राम्हणांचा आणि स्त्रियांचा नेहमीच सन्मान करावा लागेल असं सांगितलं.
या विधानाद्वारे सैनी यांना काय सांगायचं होतं ते त्यांनाच माहित असू शकतं कारण इतिहास हेच सांगतो की बाबर हा हुमायूनचा पिता होता, 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला होता तर त्याच्या 25 वर्षांनंतर 1556 मध्ये हुमायूनचा मृत्यू झाला. एकतर सैनी यांनी वडिल-मुलाच्या नात्याची आलटापालट केली आहे. हे कदाचित चुकून झालं असाव, परंतु त्यांनी हिंदुस्तानवर राज्य करण्यासाठी मुघल गायींचा, ब्राह्मणांचा व स्त्रियांचा सन्मान करत होते असं सुचवलं आहे. सध्या गायींच्या तस्करीचा आळ घेत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधल्या भाजपाच्या नेत्याच्या विधानाचे तीव्र पडसाद उठण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 11:44 am