अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आलेली असताना राजस्थान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थानमध्ये फटक्यांची विक्री व फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व करोनाबाधितांच्या आरोग्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. यंदा फटाक्यांचा वापर न करता दिवाळी साजरी करण्याचे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
“फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी वायूपासून करोनाबाधित रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी, राज्यात फटक्यांची विक्री आणि आतिषबाजीवर बंदी घालण्याचे, तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेली व धूर सोडणाऱ्या वाहनांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. असं ट्विट मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं आहे.”
पटाखों से निकलने वाले विषैले धुएं से कोविड-19 संक्रमित रोगियों एवं आमजन के स्वास्थ्य की रक्षा के लिए प्रदेश में पटाखों की बिक्री एवं आतिशबाजी पर रोक लगाने तथा बिना फिटनेस के धुआं उगलने वाले वाहनों पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए हैं। pic.twitter.com/5k50QJbG1k
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 1, 2020
जर्मनी, यूके, फ्रांस, इटली, स्पेन सारख्या देशांमध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. काही देशांना तर पुन्हा लॉकडाउन सुरू करावा लागला आहे. आपल्याकडे देखील अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून काळजी घ्यावी लागणार आहे. असंही गेहलोत यांनी सांगितलं आहे.
जर्मनी, यूके, फ्रांस, इटली, स्पेन जैसे विकसित देशों में कोरोना की दूसरी लहर शुरू हो गई है। कई देशों को तो पुनः लॉकडाउन लगाने पर मजबूर होना पड़ा है। हमारे यहां भी ऐसी स्थिति उत्पन्न न हो जाए, इसे देखते हुए हमें भी सावधानी बरतनी होगी।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 1, 2020
जगभरासह देशभरात थैमान घालणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. देशात मागील २४ तासांमध्ये ४५ हजार २३० नवे करोनाबाधित आढळले असून, ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८२ लाख २९ हजार ३१३ वर पोहचली आहे. करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला तरी देखील कराना रुग्ण संख्येत व मृतांच्या संख्येत भर पडतच आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 2, 2020 10:27 am