News Flash

राजस्थान ऑडिओ क्लिप प्रकरण; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांसह बंडखोर आमदारांविरोधात गुन्हा

आमदारांच्या खरेदी प्रकरणातील ऑडिओ क्लिप आली समोर

भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत. (फोटो/इंडियन एक्स्प्रेस)

राजस्थानातील राजकीय नाट्य शुक्रवारी नव्या वळणावर पोहोचलं. काँग्रेस सरकारसमोरील अस्थिरतेची टांगती तलवार अजूनही कायम असताना, एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या ऑडिओ क्लिप प्रकरणात काँग्रेसनं थेट भाजपाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा व संजय जैन यांची नावं घेतली होती. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानं गजेंद्र सिंह यांच्यासह काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सचिन पायलट यांच्या बंडा आधीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर याच प्रकरणात एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जयपूरमधील संजय जैन यांच्या मार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसने या ऑडिओ क्लिपची दखल घेत आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचं काँग्रेस पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे.

आणखी वाचा- राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं आहे काय ?

काँग्रेसकडून दोन आमदारांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं या ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपाचे नेते व केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह भंवरलाल शर्मा व संजय जैन या काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांवर गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपली भूमिका मांडली आहे. “त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझा आवाज नाही. त्यामुळे आपण कोणत्याही चौकशीला सामोर जाण्यास तयार आहे,” असं शेखावत यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

आणखी वाचा- राजस्थान षडयंत्र: ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, काँग्रेसकडून दोन आमदारांवर कारवाई

आणखी वाचा- राजस्थान: “काँग्रेस व्हेंटिलेटरवर, प्लाझ्मा किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही”

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

गुरुवारी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस आमदारामध्ये झालेल्या चर्चेच्या तीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस सरकार पाडण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. ऑडिओ क्लिपमधील आवाज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांचा असल्याचा दावा आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये अजून एक व्यक्ती आहे जो आमदारांना आपल्यासोबत घेण्यासंबंधी बोलत आहे. ऑडिओ क्लिपमध्ये सरकारला गुडघ्यांवर आणण्याचीही चर्चा सुरु आहे. सोबतच हॉटेलमध्ये आठ दिवस थांबण्याबद्दलही बोललं जात आहे. यावेळी मंत्री पैशांसंबंधी विचारतात तेव्हा समोरील व्यक्ती जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल आणि वरिष्ठतेसंबंधीही काळजी घेतली जाईल असं सांगत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 12:16 pm

Web Title: rajasthan drama case filed against union minister rebel congress mla bmh 90
Next Stories
1 राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजवणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं आहे काय ?
2 राजस्थान षडयंत्र: ऑडिओ क्लिपमुळे खळबळ, काँग्रेसकडून दोन आमदारांवर कारवाई
3 डबल बेडच्या बॉक्समध्ये चुकून लॉक झाल्या ८४ वर्षांच्या आजी, नातीने CCTV मध्ये बघितलं दृष्य आणि…
Just Now!
X