Rajasthan Election 2018 : मी जनतेने दिलेला कौल स्वीकारला आहे, असे म्हणत राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पराभव मान्य केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. कारण भाजपाला ७४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा आकडा १५० च्या पुढे गेला होता आणि राजस्थानमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. यावेळी मात्र ९९ जागांवर काँग्रेसला निवडत राजस्थानच्या जनतेने काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे.

जनतेने जो कौल दिला आहे तो मला मान्य असून आम्ही राजस्थानच्या जनतेसाठी बरीच कामे केली आहेत. आता यापुढचे सरकार चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे. काँग्रेसतर्फे अशोक गहलोत, सचिन पायलट या दोघांनीही निवडणूक जिंकण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या ठिकाणी सभा घेऊन राजस्थानच्या जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात ७ डिसेंबरला एकूण ७४.२१ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ४,७४,३७,७६१ मतदार असून एकूण ३३७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अलवर जिल्ह्यातील रामगड विधानसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे २९ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यामुळे येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती.

Live Blog

21:09 (IST)11 Dec 2018
मी जनमत स्वीकारले आहे-वसुंधरा राजे

मी जनमत स्वीकारले आहे . लोकांनी जो कौल दिला आहे तो मला मान्य आहे असे राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. राजस्थानच्या जनतेसाठी आम्ही भरपूर काम केले. आता सत्तेवर येणारा पक्षही राजस्थानच्या विकासात हातभार लावेल अशी अपेक्षा आहे असेही वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे 

15:13 (IST)11 Dec 2018
फक्त ०.८ टक्के मतांचा फरक

काँग्रेस आणि भाजपाच्या मतांमध्ये अवघ्या ०.८ टक्के मतांचा फरक 

15:11 (IST)11 Dec 2018
बसपा ५ जागांवर आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार १०० जागांवर काँग्रेस, ७३ जागांवर भाजपा आणि ५ जागांवर बसपा आघाडीवर आहे.

14:51 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत विजय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरा मतदारसंघातून विजयी

13:58 (IST)11 Dec 2018
Results Live: अब की बार, काँग्रेस सरकार

13:56 (IST)11 Dec 2018
Results LIVE: भाजपाला हादरा?, चार राज्यात काँग्रेस आघाडीवर

13:55 (IST)11 Dec 2018
वसुंधरा राजे यांचा विजय

झालरपाटण मतदारसंघातून मुख्यमंत्री वसुंधरा राजे विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे मानवेंद्र सिंह यांचा पराभव केला.

13:50 (IST)11 Dec 2018
काँग्रेस १०० जागांवर, भाजपा ७३, बसपा ५ जागांवर आघाडी
13:07 (IST)11 Dec 2018
अाम्हाला स्पष्ट बहुमत:सचिन पायलट

राजस्थानमधील पराभव भाजपासाठी धोक्याची घंटा आहे.  राज्यात आमचेच सरकार सत्तेवर येईल. आम्हाला स्पष्ट  बहुमत आहे. बुधवारी पक्षाच्या नूतन आमदारांची जयपूर येथे बैठक असून तिथे नेत्याची निवड होईल. मी इतर पक्षांच्याही संपर्कात आहे. फोडाफोडीचे भाजपाने राजकारण करु नये. : सचिन पायलट

12:16 (IST)11 Dec 2018
जनादेश काँग्रेसच्या बाजूने, अपक्षांचे स्वागत: अशोक गेहलोत
11:46 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचा विजय हे राहुल गांधींसाठी गिफ्ट: सचिन पायलट
11:21 (IST)11 Dec 2018
काँग्रेसच्या गिरिजा व्यास आघाडीवर

उदयपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या गिरिजा व्यास आघाडीवर. येथून गृहमंत्री गुलाबचंद कटारिया पिछाडीवर

11:16 (IST)11 Dec 2018
मुख्यमंत्री पक्ष ठरवेल: अशोक गेहलोत
10:56 (IST)11 Dec 2018
भाजपा कार्यालयात शांतता
10:32 (IST)11 Dec 2018
वसुंधरा राजे, सचिन पायलट, अशोक गेहलोत आपापल्या मतदारसंघात आघाडीवर
10:08 (IST)11 Dec 2018
गृहमंत्री गुलाबचंद कटारिया पिछाडीवर

वसुंधरा सरकारमधील गृहमंत्री गुलाबचंद कटारिया उदयपूर मतदारसंघातून पिछाडीवर

10:05 (IST)11 Dec 2018
काँग्रेस ६३ जागांवर तर भाजपा ४५ ठिकाणी आघाडीवर तर १५ मतदारसंघात इतर पक्षांची आघाडी
09:55 (IST)11 Dec 2018
वसुंधरा राजे ४०५५ मतांनी तर अशोक गेहलोत ५११२ मतांनी आघाडीवर
09:44 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचे मानवेंद्र सिंह पिछाडीवर

झालरापाटण येथून मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याविरोधात उभे राहिलेले काँग्रेसचे नेते आणि एकेकाळचे वसुंधरा राजे यांचे सहकारी मानवेंद्र सिंह पिछाडीवर. मानवेंद्र सिंह हे भाजपा नेते जसवंतसिंह यांचे चिंरजीव.

09:39 (IST)11 Dec 2018
काँग्रेस १५ तर भाजपा १३ जागांवर आघाडीवर
09:35 (IST)11 Dec 2018
७४.२१ टक्के मतदान

राज्यात ७ डिसेंबरला एकूण ७४.२१ टक्के मतदान झाले. राज्यात एकूण ४,७४,३७,७६१ मतदार असून एकूण ३३७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

09:34 (IST)11 Dec 2018
काँग्रेस ७ जागांवर तर भाजपा ६ जागांवर आघाडीवर
09:31 (IST)11 Dec 2018
जयपूर येथे सचिन पायलट यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
09:01 (IST)11 Dec 2018
टोंक मतदारसंघातून सचिन पायलट आघाडीवर
08:47 (IST)11 Dec 2018
जयपूरमध्ये काँग्रेसचा फटाके फोडून जल्लोष
08:33 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचे नेते अशोक गहलोत आघाडीवर

सरदारपुरा येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर

08:33 (IST)11 Dec 2018
वसुंधरा राजे देवदर्शनासाठी रवाना

मुख्यमंत्री वसुंधरा राजे हे देवदर्शनासाठी रवाना झाल्या आहेत. 

08:30 (IST)11 Dec 2018
पोस्टल मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर

राजस्थानमध्ये पोस्टल मतमोजणीत सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. सद्यस्थिती काँग्रेस १६ जागांवर तर भाजपा ८ जागाांवर आघाडीवर आहे.

08:18 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचे सी पी जोशी आघाडीवर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी नाथद्वारा मतदारसंघातून आघाडीवर 

08:13 (IST)11 Dec 2018
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आघाडीवर

टोंक येथून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आघाडीवर

08:12 (IST)11 Dec 2018
वसुंधरा राजे आघाडीवर

पोस्टल मतमोजणीत झालरापाटण येथून मुख्यमंत्री वसुंधरा राजे आघाडीवर

08:03 (IST)11 Dec 2018
पोस्टल मतमोजणीस सुरुवात
07:47 (IST)11 Dec 2018
एक्झिट पोलमध्ये काँग्रेसची आघाडी

बहुतांश एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता

07:37 (IST)11 Dec 2018
२०१३ मध्ये भाजपाला मिळाल्या होत्या १६३ जागा

राजस्थानमध्ये २०१३ साली विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकूण १६३ जागा मिळाल्या होत्या.

07:34 (IST)11 Dec 2018
सर्वांत प्रथम पोस्टल मतांची मोजणी

पोस्टल मतांची सर्वांत प्रथम मोजणी होणार. त्यानंतर ईव्हीएममधून मोजणी होणार.

07:33 (IST)11 Dec 2018
२० हजार कर्मचारी तैनात

मतमोजणीसाठी सुमारे २० हजार कर्मचारी तैनात, सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरुवात