News Flash

धक्कादायक: इम्रान खान झाला कबीर शर्मा, नववधूसह झाला फरार

इम्रान खानने कबीर शर्माचं सोंग इतकं हुबेहुब वठवलं की मुलीच्या घरच्यांना जराही संशय आला नाही.

राजस्थानमधील सिकरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून इम्रान खान नावाच्या व्यक्तिने हिंदू असल्याचे सांगत एका हिंदू मुलीशी लग्न केल्याचे वृत्त आहे. कुणालाही संशय येऊ नये म्हणून या भामट्यानं कबीर शर्मा नाव धारण केलं एवढंच नाही तर आई-वडील, नातेवाईकांबरोबरच वरातीतले पाहुणेदेखील बनावट आणले.

इम्रान खानने कबीर शर्माचं सोंग इतकं हुबेहुब वठवलं की मुलीच्या घरच्यांना जराही संशय आला नाही उलट त्यांनी या दोघांच्या हिंदू पद्धतीच्या साग्रसंगीत विवाहासाठी तब्बल ११ लाख रुपयांचा खर्च केला आहे, असं वृत्त मिरर नाऊनं दिलं आहे. परंतु या सगळ्या भयानक प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा कळलं की नवरदेव केवळ मुस्लीमच नाहीये तर त्याचं आधीच लग्न झालेलं असून त्याला तीन मुलंदेखील आहेत.

एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशा घटना वास्तवात घडल्या असून इम्रान खान उर्फ कबीर शर्मा नववधूसह फरार झाला आहे. जाताजाता त्यानं मुलीच्या घरच्यांचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कमही लंपास केली आहे. मुलीचा पत्ता लागत नसल्याने दुर्दैवी आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 11:47 am

Web Title: rajasthan fakes identity hires parents for second marriage
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 शपथविधी सुरु असतानाच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ रेसिपी केली पोस्ट
3 जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
Just Now!
X