News Flash

देशभक्ती जागृत करण्यासाठी वसतिगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती

७८९ वसतिगृहांना राज्य सरकारचे आदेश

संग्रहित छायाचित्र

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी राजस्थान सरकारने वसतिगृहात राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. राजस्थान सरकारच्या सामजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतला आहे. इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या सर्व ७८९ वसतिगृहांना याबद्दलचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व वसतिगृहांमध्ये दररोज सकाळी ७ वाजता राष्ट्रगीत म्हटले जाईल.

राजस्थान सरकारकडून सोमवारी याबद्दलच्या सूचना सर्व वसतिगृहांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे या वसतिगृहांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे सक्तीचे असेल. हा आदेश रविवारपासूच लागू झाल्याचे सरकारने म्हटले आहे. ‘वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल,’ अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव समित शर्मा यांनी दिली.

‘वसतिगृहातील विद्यार्थी दररोज सकाळी प्रार्थनेसाठी एकत्र येतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे राष्ट्रगीत गायनाच्या आदेशांचे पालन होत नाही. राष्ट्रगीत दररोज नियमितपणे म्हटले जावे, यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे,’ अशीही माहिती त्यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत जवळपास ८०० शाळा येतात. त्यामध्ये ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

यापूर्वी जयपूरचे महापौर अशोक लाहोटी यांनी महापालिका कार्यालयांमध्ये वंदे मातरमची सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी ‘वंदे मारतम्’ म्हणण्याचे आदेश त्यांनी दिले होते. यानंतर राजस्थान यूथ बोर्डाने ८ नोव्हेंबरला सवाई मान सिंह स्टेडियममध्ये ‘वंदे मातरम्’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:36 pm

Web Title: rajasthan government makes singing national anthem must in hostels
Next Stories
1 आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना सीबीआयच्या विशेष संचालकपदी कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
2 भाजप खासदार वरुण गांधी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसवासी होणार?
3 दहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा; हाफिज सईदची संयुक्त राष्ट्राकडे मागणी
Just Now!
X