News Flash

राजस्थान सरकारची पुढील महिन्यात जल स्वावलंबन योजना

ही योजना पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असून त्यासाठी १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

राज्यातील सर्व जलस्रोतांचा सुयोग्य वापर करण्याच्या हेतूने आणि पाण्याच्या समान वाटपासाठी राजस्थान सरकारने जल स्वावलंबन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार असून त्यासाठी १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्याचे वाहतूकमंत्री बाबूलाल वर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी यासंबंधी झालेल्या बैठकीत या योजनेला संमती दिली आहे. या योजनेला येणारा खर्च मंजूर करण्यात आला आहे. जल योजनेसाठी कॉपरेरेट आणि इतर क्षेत्रातूनही पाठिंबा मिळाला आहे.
वर्मा यांनी या वेळी काँग्रेस पक्षावर टीका केली. काँग्रेसच्या राज्यात राजस्थानच्या विकासाला खीळ बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वसुंधरा राजे यांच्या सरकारने राज्याच्या आर्थिक विकासासाठीही काही ठोस पावले उचलली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 12:01 am

Web Title: rajasthan government water autonomy plan activated in next month
Next Stories
1 केजरीवालांचा असत्यता आणि बदनामीवरच विश्वास, जेटलींचा पलटवार
2 खासगी शिकवण्या म्हणजे शैक्षणिक दहशतवाद- परेश रावल
3 ‘त्या भयानक दिसणाऱ्या माणसाने माझ्या चेहऱ्यावर सहा गोळया झाडल्या’
Just Now!
X