राजस्थान सरकार महाराणा प्रताप यांचा इतिहास बदलण्याची तयारी सुरू केली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सरकारमधील तीन मंत्र्यांनी इतिहास बदलण्याच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थान विद्यापीठाच्या बैठकीत राजस्थान सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी इतिहास बदलण्याची गरज व्यक्त केली. ‘महाराणा प्रताप यांच्या हल्दीघाटीतील युद्धाची पुन्हा एकदा चर्चा व्हायला हवी. कारण या युद्धाबाबत इतिहासकारांची मते वेगवेगळी आहेत’, या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता ‘महाराणा प्रताप हल्दीघाटीची लढाई मानसिंग यांच्या नेतृत्वाखाली केली होती. यामध्ये त्यांनी अकबरच्या सेनेचा पराभव केला होता,’ असे राजस्थानमधील विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे.

‘राजस्थानचा विचार हा अतिशय गौरवशाली आहे. आजच्या पिढीला हा इतिहास शिकवणे आवश्यक आहे. अकबर एक परकीय आक्रमक होता आणि राणा प्रताप यांनी ते युद्ध जिंकले होते, हे वास्तव आहे. ही गोष्ट सिद्धदेखील झाली आहे. इतिहासात विद्यार्थ्यांना परकीय आक्रमकांशी शिकवले जाते. महाराणा प्रताप एक शूर आणि देशभक्त शासक होते. त्यामुळे चूक सुधारुन महाराणा प्रतापच लढाई जिंकले होते, हे सत्य सांगितल्यास त्यात कोणतीही चूक नाही,’ असे राजस्थान सरकारचे मंत्री कालीचरण यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

राजस्थानच्या भूमीवर १५७६ मध्ये हल्दीघाटी युद्ध झाले होते. ‘राजस्थान विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये महाराणा प्रताप १५७६ मधील लढाई जिंकले होते, असा उल्लेख आहे. यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आम्ही याबद्दल कुलपतींना प्रस्ताव पाठवला आहे,’ असे भाजप आमदार आणि राजस्थान विद्यापीठाचे सिंडीकेट सदस्य सतीश चंद्रा यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी राजस्थान विद्यापीठाचे एक प्राध्यापक आणि इतिहासकार डॉक्टर चंद्रशेखर शर्मा यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. या शोध निबंधात हल्दीघाटीचे युद्ध १८ जून १५७६ रोजी मेवाड आणि मुघलांमध्ये झाले होते. या युद्धाविषयी विविध कहाण्या सांगितल्या जातात. मात्र या युद्धात महाराणा प्रताप यांनी विजय मिळवला होता. डॉ. शर्मा यांनी महाराणा प्रताप यांचा विजय दर्शवणारे काही दस्ताऐवज विद्यापीठात जमा केले आहेत.