24 September 2020

News Flash

जोधपूरजवळ हवाई दलाचे मिग-२३ विमान कोसळले

दुर्घटनेचे कारण अस्पष्ट

राजस्थानमधील जोधपूरजवळ गुरुवारी सकाळी हवाई दलाचे मिग- २३ हे लढाऊ विमान कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेविषयी अद्याप हवाई दलाने प्रतिक्रिया दिलेली नसून विमान कोसळण्याचे कारणही अजून अस्पष्ट आहे. विमानातील दोन्ही वैमानिक सुखरुप असून वेळीच विमानातून बाहेर पडल्याने दोघेही बचावले आहेत.

जोधपूरमधील बालेसार येथे हवाई दलाचे मिग-२३ हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. गेल्या आठवड्याभरात हवाई दलाला बसलेला हा दुसरा हादरा आहे. यापूर्वी ४ जुलैरोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूम परे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. बुधवारी या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता.  दरम्यान, गुरुवारी सकाळी कोसळेले मिग २३ विमानाच्या दुर्घटनेचे कारण अजून अस्पष्ट आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरु असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2017 12:50 pm

Web Title: rajasthan iaf mig 23 aircraft crashes in balesar jodhpur casualties
Next Stories
1 अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी विहिंपकडून तीन ट्रक शिळा
2 शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मुस्लिम कुटुंबानं स्वीकारला हिंदू धर्म
3 बोगस जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांची पदवी आणि नोकरी जाणार: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X