News Flash

ACB ने टाकला छापा; तहसीलदाराने स्वत:ला घरात कोंडून घेत २० लाखांच्या नोटा जाळल्या

एसीबीचे अधिकारी घराबाहेर उभे असतानाच तो घरात नोटा जाळत होता

फोटो ट्विटरवरुन साभार

राजस्थानमधील एका तहसीलदाराने तब्बल १५ ते २० लाख रुपये किंमतीच्या नोटा स्टोव्हवर जाळल्याची माहिती समोर येत आहे.  लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे (एसीबी) अधिकाऱ्यांनी या तहसीलदाराच्या घरावर छापा टाकला. मात्र अधिकारी घरामध्ये शिरण्याआधीच या तहसीलदाराला त्यासंदर्भात माहिती मिळाल्याने त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि घरातील स्टोव्हवर लाखो रुपयांच्या नोटा जाळल्या. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमधील जमीन अभिलेख निरीक्षक असणाऱ्या परबत सिंहला एक लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाला यश आलं. याचं प्रकरणात तहसीलदाराला पकडण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाची टीम पोहचली असता त्याने स्वत:ला कोंडून घेतलं. बुधवारी रात्री या सर्व नाट्यमय घडामोडी घडल्या.

तहसीलदार कल्पेश कुमार जैन असं या तहसीलदाराचं नाव आहे. एका कंत्राटदाराकडून सरकारी कंत्राट देण्याच्या नावाखाली कल्पेशने लाच मागितल्याचा खुलासा त्यांच्याच कार्यालयामध्ये काम करणाऱ्या परबत सिंहने केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक बीएल सोनी यांनी दिली आहे.

जेव्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने परबत सिंहच्या माहितीनुसार तहसीलदाराच्या निवासस्थानी छापा टाकला तेव्हा घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या लावून कल्पेशने स्वत:ला कोंडून घेतलं. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांना घरात प्रवेश करता आला नाही. हे अधिकारी घराबाहेरुन कल्पेशला दरवाजा उघडण्यास सांगत असतानाच त्याने घरामध्ये १५ ते २० लाखांच्या नोटा जाळल्या.

बऱ्याच प्रयत्नानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी या घरात घुसले तेव्हा त्यांना किचनमध्ये जाळलेल्या नोटा आणि दीड लाख रुपये रोख रक्कम मिळाली.  या प्रकरणामध्ये कल्पेश आणि परबत सिंह दोघांनाही अटक करण्यात आली आहे अशी माहिती सोनी यांनी दिलीय.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 8:08 am

Web Title: rajasthan tehsildar burns rs 20 lakh as acb visits over bribery allegations scsg 91
Next Stories
1 भारतातून करोना लशीची निर्यात स्थगित
2 अल्पसंख्याकांच्या मतांवर डल्ला मारण्यासाठीच विरोधकांचा राज्यातील नव्या राजकीय पक्षाला पाठिंबा
3 लष्कराचे मूल्यमापन निकष भेदभावजनक
Just Now!
X