‘कन्हैया कुमारसारखा आणखी कुणी जन्माला येऊ नये’, हे निश्चित करण्यासाठी शाळांच्या अभ्यासक्रमात, तसेच स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांच्या आत्मचरित्रांत मोठे बदल करण्यात येत आहेत, असे राजस्थानच्या शिक्षण राज्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्याकरिता शाळांच्या अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल करण्यात येत असल्याचे राजस्थानचे शिक्षण राज्यमंत्री (प्राथमिक व माध्यमिक) वासुदेव देवनानी विधानसभेत म्हणाले.
जेएनयूमध्ये अलीकडेच घडलेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती बाणवण्याकरिता सर्व सरकारी विद्यापीठांना राष्ट्रीय ध्वज फडकावण्यास सांगण्यात आले असल्याचे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री कालिचरण सराफ यांनी सांगितले.